कोण होईल महाराष्ट्राचा पहिला “संगीत सम्राट “?

147

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी प्रेक्षकांसाठी झी युवा ही वाहिनी ‘संगीत सम्राट’ हा एक अनोखा संगीतमय कार्यक्रम घेऊन आली आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले अनेक गायक, वादक आणि ज्यांच्या श्वासात संगीत आहे असे अनेक कलावंत संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे मराठी रसिकांसमोर त्यांची कला सादर करणार आहेत.

महाराष्ट्राचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे सूर ताल आणि लय या बाबतीत कलाकारांचे परीक्षण करणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका क्रांती रेडकर वानखेडे कलाकारांचा परफॉर्मन्स किती मनोरंजनात्मक आहेत याचे परीक्षण करणार आहे. तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर निवेदनाची भूमिका सांभाळणार आहेत. प्रेक्षकांना हा कार्यक्रम २६ जून पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या