माता न तू वैरिणी! सांगलीत नवजात मुलीची आईकडून निर्घृण हत्या

मुलीच्या जन्मानंतर अवघ्या काही तासात जन्मदात्या निर्दयी मातेने या अर्भकाची हत्या केल्याची घटना सांगलीत घडली आहे. आरोपी मातेवर मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सुप्रिया गंगाप्पा जुट्टी असे या निर्दयी मातेचे नांव आहे ती कर्नाटकातली असून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आली होती. शनिवारी तिने एका मुलीला जन्म दिला. या निर्दयी मातेने नवजात मुलीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला, पण एका महिलेने डॉक्टरांना याची कल्पना दिली. डॉक्टरांनी त्या नवजात मुलीची तपासणी केली असता मुलीच्या गळ्यावर व्रण आढळले.

रुग्णालय प्रशासनाने तातडीने या बाळावर उपचार सुरू केले. मात्र रविवारी उशिरा नवजात बाळाचे निधन झालं. काही तासांपूर्वी जन्मलेल्या आपल्या पोटच्या मुलाला जन्मदात्या आईनेच गळा दाबून ठार मारल्याने रुग्णालय हादरलं. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या मातेविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र मातेने मुलीची हत्या का केली? हे कोडं मात्र अद्याप सुटलेलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या