सांगली – रुग्णांना लुटणार्‍या हॉस्पिटलविरुद्ध जिल्हा प्रशासन आक्रमक, जास्तीचे पैसे परत देण्याचे आदेश

678

कोरोनाग्रस्त रुग्णांना लुटणार्‍या हॉस्पिटल विरुद्ध जिल्हा प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलले आहे. रुग्णाकडून ज्यादा घेतलेले तीन लाख 21 हजार रुपये संबंधितांना परत करण्याचे आदेश या रुग्णालय व्यवस्थापनाला दिले आहेत, तसेच बिलांची ठोस माहिती देऊ न शकल्याने पाच लाख 51 हजारांची बीले थांबवली आहेत. यापुढे एकाही  हॉस्पिटलचे बिल लेखापरीक्षणाशिवाय दिले जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला आहे.

खासगी रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णांची सर्रास लूट सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रूग्णालयातून सुरू असलेल्या या लुटीचा पायबंद घालण्यासाठी शासकीय लेखापरीक्षकांच्या पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकामार्फत कोरोना  बाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात करण्यात येणार्‍या उपचारांची बिले तपासण्यात येत आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलेल्या पथकाने आतापर्यंत विविध हॉस्पिटलची 72 बिले तपासली. यामध्ये नियमबाह्य आकारलेले तीन लाख 21 हजार रुपये रुग्णांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. तर रुग्णालयाने औषध व तपासणीच्या पावत्या सादर न केल्याने पाच लाख 91 हजार रुपयांची बिले थांबवली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या