सानियाचा लेक घेतोय असद खालूची फिरकी

544
टेनिसपटू सानिया मिर्झा हिने 30 ऑक्टोबर 2018 रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या लेकाचा, इजहानचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती बहिणीचा नवरा आणि मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा मोहम्मद अससुद्दीन याला चिडवताना दिसत आहे. या गोड व्हिडीओत सानिया लेकाला विचारतेय, असद खालू काय करतो? त्यावर इजहान हाताने चौक्याचा इशारा करतो. आणि बाबा शोएब मलिक काय करतो, असं विचारल्यावर इजहान सिक्सर म्हणतो. हा क्हिडीओ शेअर करताना सानियाने ’हे जरा पक्षपाती असू शकतं’, अशी कंमेंटही केली आहे. त्यावर अससुद्दीन याने हार्ट ईमोजी टाकून कमेंट केलेय. हार्दिक पंडय़ादेखील हा क्युट व्हिडीओ बघून स्वत:ला आवरू शकला नाही. त्यानेही हार्ट ईमोजीची कमेंट करून इजहानचं कौतुक केलंय.


View this post on Instagram

Asad khaalu hits a 4 but Baba hits a 6 he might be a bit biased @izhaan.mirzamalik #Myizzy

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

मोहम्मद अससुद्दीन याने रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. गेल्या वर्षी सानियाची बहीण अनम हिच्यासोबत त्याचे लग्न झाले सध्या सानिया मुलासोबत हैदराबाद येथे राहतेय, तर शोएब मलिक पाकिस्तानात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या