सानियाच्या बहिणीचा निकाह, वर्षभरापूर्वी झाला होता तलाक

1911

हिंदुस्थानची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्या घरी सध्या पाहुण्यांची रेलचेल वाढली आहे. निमित्त आहे तिची बहिण अनम मिर्झा हिच्या निकाहचे. वर्षभरापूर्वी तलाक झालेली अनम आता पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. या निमित्ताने सध्या सानियाच्या घरी विविध कार्यक्रम सुरू आहे. नुकतेच अनमच्या मेहंदीचे फोटोही समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अनमसोबत सानियाने देखील आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.

mirza

अनम मिर्झा हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहेंदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती हिरव्या आणि निळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

anam-sania

अनमसह सानिया देखील काळ्या आणि नारंगी रंगाच्या अॅब्रॉयडरी केलेल्या स्कर्टमध्ये सुंदर दिसत आहे. यासोबत तिने सुंदर नेकलेस आणि कानातले देखील घातलेले आहे.

sania

अनम मिर्झा हिचे हे दुसरे लग्न आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटून अझरुद्दीन याचा मुला असदुद्दीन याच्याशी तिचा निकाह होत आहे. याआधी तिने अकबर रशिदची निकाल केला होता मात्र हे लग्न काही फार काळ टिकले नाही.

anam-mirza

आपली प्रतिक्रिया द्या