‘मी पाकिस्तानी संघाची आई नाही’, सानिया मिर्झा मलिकवर संतापली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 89 धावांनी दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या या पराभवाला टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकला जबाबदार धरले जात आहे. पाकिस्तानी चाहत्यांप्रमाणेच अभिनेत्री विणा मलिकने देखील शोएब मलिक आणि सानियावर हल्लाबोल केला. विणा मलिकच्या आरोपांना सानियानेही चोख उत्तर दिले आहे.

कुलदीपला वॉर्नच्या पंक्तीत स्थान, आयसीसी म्हणते बाबरला बाद केला तो ‘सर्वोत्कृष्ट चेंडू’

पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सानिया आपला पती शोएब आणि मुलांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे दिसते. यावर टीका करताना विणा मलिकने ट्वीट केले की, ‘सानिया, मला तुझ्या मुलांची चिंता वाटते. तुम्ही लोक त्याला घेऊन शिशा पॅलेसमध्ये गेलात. त्याच्या तब्येतीसाठी हे घातक नाही का? हे रेस्टॉरंट फक्त जंक फूडसाठी प्रसिद्ध आहे हे मला माहिती आहे. येथे जाणे खेळाडू आणि लहान मुलांसाठी योग्य नाही. तू स्वत: एक खेळाडू आहे आणि आई देखील, तुला हे माहिती असायला हवे’, असा टोला विणा मलिकने लगावला.

विणा मलिकच्या या ट्वीटनंतर सानिया संतापाने लाल झाली. विणा मलिकच्या ट्वीटला तिने जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘विणा, मी माझ्या मुलांना घेऊन शिशा पॅलेसमध्ये गेले नव्हते आणि हो त्यासाठी तुला आणि जगाला याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. इतर लोकांपेक्षा मी माझ्या मुलाचे योग्यप्रकारे पालन-पोषण करू शकते. दुसरी गोष्ट मी काही पाकिस्तानी संघाची आहारतज्ज्ञ नाही. तसेच त्यांची आई, मुख्याध्यापिका किंवा शिक्षिकाही नाही, असे ट्वीट करून सानियाने विणाचा पानउतारा केला.