अभिनेता संजय दत्तची प्रकृती बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल

1811

अभिनेता संजय दत्त याला आज सायंकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजय दत्त याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अचानक कमी होऊन त्याला छातीमध्येही दुखू लागले होते. त्याची कोरोनासाठी रॅपिड ऍन्टीजन चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आल्याने त्याचे नमुने घेऊन ते पीसीआर चाचणीसाठी पाठवण्यात आले.

सध्या त्याला नॉन-कोविड वॉर्डात ठेवण्यात आले आहे. त्याच्या आणखी काही तपासण्या करण्याच्या सूचना तज्ञ डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती लिलावती रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ. व्ही. रवीशंकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या