संजय बांगर यांचा पत्ता कट

536

चेअरमन एमएसके प्रसाद, सरणदीप सिंग, गगन खोडा, जतीन परांजपे व देवांग गांधी यांच्या अखिल हिंदुस्थानी सीनियर निवड समितीने गुरुवारी मुंबईत टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफ निवडीची प्रकिया पूर्ण केली. वर्ल्ड कपमधील पराभवाला कारणीभूत असलेल्या संजय बांगर यांचा पत्ता अपेक्षेप्रमाणे कट झाला आहे. निवड समितीकडून विक्रम राठोड यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून पहिली पसंती देण्यात आली आहे. बी. अरुण हे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून तर आर. श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम राहिले आहेत. निवड समितीकडून प्रत्येक पदासाठी तीन व्यक्तींची क्रमानुसार निवड केली असून अव्वल असलेल्या व्यक्तीला हितसंबंध मुद्दय़ाची तपासणी केल्यानंतर पदावर रुजू होता येणार आहे.

फलंदाजी प्रशिक्षकासाठी 14 व्यक्तींनी, गोलंदाजी प्रशिक्षकासाठी 12 व्यक्तींनी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी नऊ व्यक्तींनी, फिजियोथेरपिस्टसाठी 16 व्यक्तींनी, स्ट्रेंथ ऍण्ड कंडिशनिंग पदासाठी 12 व्यक्तींनी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर पदासाठी 24 व्यक्तींनी अर्ज केला होता. नितीन पटेल फिजियोथेरपिस्ट म्हणून आणि गिरीश डोंगरे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ल्यूक वुडहाऊस, ग्रॅण्ट ल्युडेन, रजनिकांत एस, नीक वेब व आनंद दाते यांच्यात स्ट्रेंथ ऍण्ड कंडिशनिंग पदासाठी चुरस लागली असून दुसऱया फेरीनंतर या पदासाठी अंतिम निवड करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या