KGF2 मधील संजय दत्तचा फर्स्ट लुक प्रसिद्ध

केजीएफ-2 चित्रपटातील अभिनेता संजय दत्त याने महत्वाची भूमिका साकारली असून, चित्रपटातील त्याच्या भूमिकेचा फर्स्ट लुक निर्मात्यांनी प्रसिद्ध केला आहे. संजय दत्त याचा आज वाढदिवस आहे. निर्मात्यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं की त्याच्या वाढदिवशी चित्रपटातील त्याचा लुक प्रसिद्ध केला जाईल.

संजय दत्त याने चित्रपटामध्ये ‘अधिरा’ची भूमिका साकारली असून  एक्सेल एंटरटेनमेंट आणि निर्माता रितेश सिधवानी यांनी अधिराचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

KGF-2 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित व्हावा यासाठी कंपन्यांची धडपड

इंग्लंडमधील प्राचीन काळातील व्हायकिंग्ज म्हणजेच सरदार मंडळी असत, त्या व्हायकिंग्जच्या रुपात संजय दत्त आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये अधिरा हा मुख्य खलनायक असून अभिनेता यश हा नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

संजय दत्तने यानेही हा फोटो शेअर केला असून त्यात त्याने लिहिले आहे की “या चित्रपटात काम करून मला आनंद झाला आहे. वाढदिवसाच्या दिवशी मला यापेक्षा जास्त चांगली भेट मिळाली नसती. केजीएफ चॅप्टर 1 ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटामुळे अभिनेता यश याची प्रसिद्धी आणखीनच वाढली होती. निर्मात्यांनी केजीएफ चॅप्टर 2 चे पहिले पोस्टर लाँच केल्यानंतर अधिराचा फर्स्ट लुक हा एक वर्षानंतर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

केजीएफ चित्रपटाच्या पहिला भागामध्ये अभिनेता यशने साकारलेल्या रॉकीने त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या गरुडाचा वध केला होता. गरुडाला लोकांना गुलाम बनवून आणि क्रूर वागणूक देत कोलारमधील सोन्याच्या खाणींवर वर्चस्व ठेवून होता. त्याचे हे वर्चस्व रॉकी मोडीत काढतो असं पहिल्या भागात दाखवण्यात आले होते. गरुडा जिवंत असेपर्यंत आपण सोन्याच्या खाणींवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार नाही असे अधिराने वचन दिले होते. गरुडाच्या मृत्यूनंतर रॉकी आणि अधिरा यांच्यातील संघर्ष यामुळे अटळ बनला आहे. विजय किलागंदुर हे चित्रपटाचे निर्माते असून प्रशांत नील हे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या