अभिनेता संजय दत्तला फुप्फुसाचा कर्करोग; उपचारासाठी अमेरिकेला जाणार

758

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला फुप्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा कर्करोग तिसऱया टप्प्यात असून लवकरच तो उपचारासाठी अमेरिकेला जाणार असल्याचे समजते.

श्वासोच्छ्कास घेण्यास त्रास होत असल्याने नुकतेच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांनंतर मंगळवारी त्याला डिस्चार्ज दिला होता. ‘वैद्यकीय उपचारासाठी मी कामातून छोटासा ब्रेक घेतोय’ असे ट्किट त्याने मंगळवारी केले होते. दरम्यान संजय दत्त कर्करोगातून सुखरूप बाहेर यावा यासाठी त्याच्या लाखो चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी प्रार्थना केली आहे. ‘तू फायटर आहेस. या वेदना काय असतात, हे मला माहितीये’ असे ट्विट क्रिकेटपटू युवराज सिंहने केले आहे.

आगामी काळात संजय दत्त ‘सडक 2’, ‘भुज’, ‘केजीएफ 2’ या चित्रपटात झळकणार आहे. संजय दत्त कामातून ब्रेक घेणार असल्याने ‘शमशेरा’ चित्रपटाच्या शूटिंगला फटका बसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे.

मान्यता म्हणाली, संजू लढवय्या आहे!

संजय दत्तच्या आजाराबद्दल त्याची पत्नी मान्यताने बुधवारी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. मान्यता म्हणाली, ‘संजय दत्तच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱया हितचिंतकांचे आभार. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला बळ आणि प्रार्थनांची गरज आहे. मागच्या काही वर्षात आमचे कुटूंबीय अनेक अडचणींतून गेले आहे. हा काळसुद्धा निघून जाईल. कोणत्याही अफका पसरवू नका. तुमचे प्रेम आणि पाठिंबा कायम राहू द्या. संजू लढवय्या आहे. देवाने परीक्षेसाठी आम्हाला निवडले आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या