… मग काय मुख्यमंत्र्यांनी शाळांमध्ये पहारा द्यायचा का? मिंधे गटाच्या संजय गायकवाड यांचे धक्कादायक विधान

मिंधे गटाचे गद्दार आमदार संजय गायकवाड हे कायम त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असतात. बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात एक अत्यंत असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण व मुलींच्या सुरक्षेबाबत पत्रकारांनी संजय गायकवाड यांना प्रश्न केला असता त्यांनी ”… मग काय मुख्यमंत्र्यांशी शाळांमध्ये पहारा द्यायचा का? असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. त्यांच्या या असंवेदनशील वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

”काल मी आंदोलन पाहिलं. सगळे पक्ष सरकारविरोधात घोषणा देत थयथयाट करत होते. पण मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पाहारा देणार का? महाराष्ट्राचे पोलीस आरोपीच्या घरी जाऊन बसणार का? की आरोपी सांगतो चल ये मी बलात्कार करतोय या मला पकडायला? या घटना घडत असतात. त्यासाठी पोलीस यंत्रणा काम करते. पोलिसांकडून नाही झालं तर CBI वाले करतील. सीबीआयकडून नाही झालं तर SIT वाले करतील, पण आरोपीला सोडत नाही. त्यामुळे अशा घटनांचे राजकारण करण्यापेक्षा या नराधमांना शिक्षा कशी मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजे. ते प्रयत्न महाराष्ट्रात होताना दिसत नाही”, असे संजय गायकवाड म्हणाले.