संजय कुमार यांनी घेतली वीज आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ

राज्याचे माजी मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे त्यांना शपथ दिली. पढील पाच वर्षे आयोगाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहणार आहेत.

वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या आनंद कुलकर्णी यांचा कार्यकाल जानेवारी महिन्यात संपल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. वीज आयोगाची 1999 मध्ये जेव्हा स्थापना झाली होती, त्यावेळी आयोगाचे पहिले सचिव म्हणूनही संजय कुमार यांनी काम पाहिले आहे. सध्या वीज आयोगावर सदस्य म्हणून माजी ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर आणि माजी न्यायमूर्ती आय. एम. बोहरी हे कार्यरत आहेत. या शपथविधी सोहळय़ाला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या