‘पद्मावती’च्या सेटवर हल्लाबोल, भन्साळी यांना लगावली थप्पड

सामना ऑनलाईन । जयपूर

‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर चुकीचा इतिहास दाखवत असल्याचा आरोप करत ‘करणी सेने’च्या आंदोलकांनी हल्ला केला. करणी सेना ही हा हल्ला राजपूत समाजाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते.

जयपूरमधील जयगड किल्ल्यात ‘पद्मावती’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. ‘पद्मावती’ चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केला जात असल्याचा आरोप करत चित्रिकरणाच्या ठिकाणी ‘करणी सेने’चे आंदोलन सुरू होते. या वेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना आंदोलकांनी थप्पड लगावली. त्याचा व्हिडिओही वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्यात आला. तसेच आंदोलकांनी सेटची मोडतोड देखील केली. अभिनेत्री दीपिका पदुकोण चित्रपटात राणी पद्मावती यांची भूमिका साकारत असून अभिनेता रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे. या दोघांवर आपत्तीजनक दृश्ये चित्रित करण्यत येत असल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. तसेच या चित्रपटातून भन्साळी यांनी राजपूत राणीशी संबंधित असलेले दृश्ये वगळण्याची मागणी करणी सेनेने केली आहे.