संजय निरुपम, मिलिंद देवरा काँग्रेसचे खरे नेते नाहीत- शरद पवार

1724

ग्रामीण भागात आजही काँग्रेस नेत्यांची नाळ जनतेशी जुळलेली आहे मात्र संजय निरुपम आणि मिलिंद देवरा हे तळागाळातील नेते नाहीत तसेच ते काँग्रेसचे खरे नेते नाहीत असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना पवारांनी हे वक्तव्य केले आहे.

हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राला मुलाखत देताना मुलाखाकाराने प्रश्न विचारला की काँग्रेसमध्ये अजूनही गटातटांचे राजकारण आहे. संजय निरुपम आणि मिलिंद देवरा सारखे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. तेव्हा पवार म्हणाले की, ग्रामीण भागात आजही काँग्रेसची नाळ जनतेशी जोडलेली आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार न पाहता फक्त काँग्रेस पक्ष पाहून मत दिले जाते. जी तुम्ही नावं घेतली ते काँग्रेसचे खरे नेते नाहीत.” हे नेते जरी पक्षात असले तरी ते तळागाळातले नेते नाहीत असेही पवार म्हणाले.

राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडण्याची गरज नव्हती असेही पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीचा निकाल योग्य लागला नाही, म्हणून राहुल गांधींनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. असे केल्याने  संघटनेत चुकीचा संदेश जातो असे पवार म्हणाले आहेत. तसेच त्यांनी ही जबाबदारी पुन्हा स्वीकारावी अशी विनंतीही आपण राहुल गांधी यांना केल्याचे पवारांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या