काँग्रेसमधला ‘निकम्मा’ कोण? संजय निरुपम यांच्या ट्वीटमुळे सोशल मीडियात धुमाकूळ

1017
sanjay-nirupam

#MahaElection 2019 विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार सर्व पक्षांकडून जोरात सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत राजकारणामुळे आपापसातच लढाई सुरू आहे. काँग्रेसमध्येच्या प्रचारापेक्षा त्यांच्या अंतर्गत वादांचीच चर्चा अधिक होत असल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. अशातच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्वीट बॉम्ब टाकत स्वपक्षालाच अडचणीत आणले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रॅलीवेळी संजय निरुपम तेथे उपस्थित नसल्याने त्यांच्यावर पक्षातून मोठ्या प्रमाणावर टीका सुरू होती. निरुपम यांना त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी टार्गेट केले. यामुळे संतापलेल्या निरुपम यांनी आपण मुंबईतील त्या रॅलीला का उपस्थित नव्हतो याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे मी तो संपूर्ण दिवस व्यग्र होतो. यासंदर्भात मी राहुल गांधी यांना आधीच माहिती दिली होती’, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी ‘निकम्मा’ या रॅलीला का अनुपस्थित होता? असा सवाल त्यांनी केला आहे. या संजय निरुपम यांनी ‘निकम्मा’ असा उल्लेख केल्याने चर्चांना उधाण आले आहे. निकम्मा शब्द नक्की कुणासाठी वापरला असावा असे तर्तवितर्क सोशल मीडियावर लढवले जात आहेत.

अनेकांनी या ट्वीटनंतर या हल्ल्याचा संबंध काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांच्याशी जोडला आहे. निकम्मा शब्दाचा वापर हा त्यांच्यासाठी करण्यात आला असावा तर्क दिला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील वाद लपून राहिलेला नाही. तिकीट वाटपावेळी देखील संजय निरुपम यांनी जोरदार हल्ला चढवला होता. आता या ट्वीटनंतर येत्या दिवसांत आणखी काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या