आजही देशभक्तांना बलिदान द्यावे लागते म्हणजे सरकारमध्ये मिस्टेक आहे – राऊत

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहेत. हिंदुस्थानला स्वतंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली तरीही देशभक्तांना बलिदान द्यावे लागते. म्हणजे या सरकारमध्येच मिस्टेक आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

जम्मूतील अनंतनागमध्ये शहीद झालेल्या जवानांना आज शनिवारी शिवसेनेच्या वतीने क्रांतीचौकात आदरांजली वाहण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. देशासाठी अनेक जवान बलिदान देत आहेत. दु:ख एवढेच वाटते की, जवान शहीद होत असताना पंतप्रधान दिल्लीत भाजप कार्यालयात सत्कार स्वीकारण्यात, फुले उधळून घेण्यात दंग होते. आजही कश्मिरी पंडित आश्रितांचे जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी सरकार काहीच करीत नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

तेथे नाकाबंदी केली असती तर…
शहरात सरकार आले आहे, पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहे. बैठकीसाठी नाकाबंदी करण्यात आलेली आहे, रस्ते बंद आहेत. अशी नाकाबंदी जम्मू कश्मिरमध्ये केली असती तर जवान शहीद झाले नसते. 2019 निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामात 40 जवानांचे बलिदान देण्यात आले, असा गौप्यस्फोट राज्यपाल मलिक यांनी केल्याची आठवण यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी करून दिली.

सरकारला हृदयही नाही अन् मनही
मंत्रिमंडळ बैठकीसाठी आलेल्या एकालाही येथे येऊन जवानांना श्रद्धांजली वाहावी, असे वाटले नाही. तुमच्यात आत्मा शिल्लक असता तर बैठकीपूर्वी येथे येऊन त्यांनी पुष्पचक्र वाहिले असते, परंतु ज्या सरकारला हृदयही नाही आणि मनही नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याद रखेंगे कुर्बानी म्हणत असताना निर्दयी सरकारचे विस्मरण होता कामा नये, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना संभाजीनगरच्या वतीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गणेश महासंघाचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, बाप्पा दळवी, आनंद तांदुळवाडीकर, अनिल पोलकर, जयवंत ओक, राजू राठोड, अशोक शिंदे, कृष्णा डोणगावकर, बाबासाहेब डांगे, विनायक पांडे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपशहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, प्रमोद ठेंगडे, अनिल जैस्वाल, संतोष खेंडके, जयसिंग होलीये, प्रकाश कमलानी, राजेंद्र दानवे, बापू पवार, शिवा लुंगारे, नितीन पवार, संदेश कवडे, संजय हरणे, रतनकुमार साबळे, दिग्विजय शेरखाने, मकरंद कुलकर्णी, चंद्रकांत इंगळे, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, मनोज गांगवे, सुभाष शेजवळ, कमलाकर जगताप, गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, संजय हरणे, सचिन तायडे, भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते, दत्ता पवार, अरविंद धीवर, बाळासाहेब कार्ले, सुरेश गायके, प्रवीण शिंदे, बापू कवळे, लक्ष्मण बताडे, भानुदास ससे, वैजनाथ मस्के, बाबासाहेब आगळे, बाबू वाकीकर, प्रशांत कुर्‍हे, रितेश जयस्वाल, गौरव पुरंदरे, प्रवीण शिंदे, सतीश कटकटे, नंदू लबडे, समीर कुरेशी, कैलास राठोड, गणेश लोखंडे, अंकुश वैद्य, संजय पेरकर, सचिन सुलताने, सुखराज हिवराळे, प्रितेश जैस्वाल, मिथुन व्यास, सुधीर घाडगे, मिलिंद सेवलीकर, रोहित बनकर, समीर कुरेशी, प्रभात पुरवार, चंद्रकांत देवराज, रेवण सोनवणे, नारायण कानकाटे, लखन सलामपुरे, गोरख सोनवणे, संतोष बोडखे, प्रतीक अंकुश, युवा सेनेचे धर्मराज दानवे, युवती सेनेच्या सानिका देवराज, शिवसेना महिला आघाडीच्या सुनीता देव, सुनीता आऊलवार, कला ओझा, दुर्गा भाटी, जयश्री लुंगारे, विद्या अग्निहोत्री, आशा दातार, सुनीता सोनवणे, नलिनी महाजन, मीरा देशपांडे, सुनंदा खरात, राजश्री पोफळे, सुकन्या भोसले, मंजूषा नागरे, पद्मा तुपे, सीमा गवळी, संगीता पुणेकर, रेखा शहा, सारिका शर्मा, अरुणा भाटी, लता शंकरपाळ, नुसरत शेख, वनमाला पटेल, माजी नगरसेविका मीना गायके, मीना थोरवे व सुषमा यादगिरे आदींची उपस्थिती होती.