Video – यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे – खासदार संजय राऊत

जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष एकत्र असलेली विरोधी पक्षांची मजबूत आघाडी देशात निर्माण होण्यासाठी यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे मत शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर शनिवारी खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आतापर्यंत काँग्रेसने यूपीएचं नेतृत्व केलं. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ही जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळली. त्यांची प्रकृती बरी नसते, त्या ऑक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये दिसत नाही, यामुळे यूपीएची ताकद कमी होत आहे. जे एनडीए व यूपीएत नाहीत अशा अनेक प्रादेशिक पक्षांना भाजपाविरुद्ध उभे राहण्याची इच्छा आहे, या पक्षांना यूपीएत आणण्यासाठी शरद पवार यांच्याइतका ताकदीचा नेता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जींचाच विजय होणार

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, पडद्यावरच्या रामायणात तेथील जनता किती-किती जोडली जाईल हे माहित नाही. पण, सध्या देशाचं महाभारत पश्चिम बंगालच्या भूमीवर घडतंय. एका स्त्र्ााrच्या पराभवासाठी संपूर्ण देशाची सत्ता कामाला लावली जातेय. आरजेडी, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यासह आम्ही सगळेच राजकीय पक्ष ममता बॅनर्जींच्या पाठीशी उभे आहोत. तेथे भाजपाच्या जागा वाढल्या तरी त्यांना बहुमत मिळणार नाही. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचीच तेथे सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.<

आपली प्रतिक्रिया द्या