‘हीरामंडी’ या वेबसिरीजमधून सर्वांचे लक्ष वेधणारी अभिनेत्री संजीदा शेख पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संजीदाचे तिच्या डेनिम ऑन डेनिम या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. . या लूकमध्ये ती अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. या फोटोंमध्ये संजिदाने बटण नसलेले डेनिम जॅकेट आकर्षक पद्धतीने कॅरी केले आहे. तसेच या जॅकेटशी मिळती जुळती पॅण्ट तिने घातली आहे. या फोटोंमध्ये तिने केस मोकळे सोडले असून चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे. तिच्या फोटोंमधील पोझमध्ये तिचा आत्मविश्वास दिसत आहे.