रत्नागिरी : छायाचित्रकार संजीव साळवी यांचे हृदयविकाराने निधन

496

रत्नागिरीतील छायाचित्रकार आणि हरहुन्नरी कलाकार संजीव साळवी यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. दोन आठवडय़ांपूर्वी संजीव साळवी यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र सोमवारी रात्रीपासून त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला आणि मंगळवारी सकाळी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. संजीव साळवी यांनी छायाचित्र आणि मॉडेलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते. अलीकडे ते गोव्यामध्ये कार्यरत होते. त्याचबरोबर अभिनेता, मिमिक्री आणि निवेदक म्हणून त्यांची ओळख होती.

आपली प्रतिक्रिया द्या