पुस्तकवाली बाई

167

>संजीवनी धुरी-जाधव

आतापर्यंत ट्रेनमध्ये केकळ गरजू महिला विक्रेत्या आपण पहिल्या आहेत. पण जेव्हा एका चांगल्या पगाराची नोकरी करणारी महिला ट्रेनमध्ये पुस्तक विकते तेव्हा…? आश्चर्य वाटतंय ना? पण हे खरंय. आपण लिहिलेले पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी ते वाचावे याच हेतूने गोरेगावच्या लेखिका सई दळवी ट्रेनमध्ये पुस्तक विकतात. कुठलाही संकोच न बाळगता… त्यांच्या या धाडसाचे कौतुक करायलाच हवे.

राज्य शासनाच्या वित्त आणि लेखा विभागात सई दळवी या उपसंचालक म्हणून काम करतात. बीएला असताना त्यांनी इंग्लिश लिटरेचर घेतले होते. अनेक लेखकांच्या कथा त्यांच्या सिलॅबसमध्ये होत्या. त्यावेळी त्यांना फ्रेंच लेखक गी. द. मोपासाँची शैली जबरदस्त भावली. त्यांची लिखाणाची शैली कोणालाही भाराऊन टाकणारी आहे. त्यामुळे त्यांनी बीएला असतानाच ठरवले की पास आऊट झाल्यावर यावर आपण काही निवडक कथा आपण अनुवादीत करायच्या आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केले.

साधारण तीन महिन्यात त्यांनी हे पुस्तक अनुवादीत केले. अर्थात यासाठी त्यांच्या वडिलांची मोलाची मदत त्यांना मिळाली. त्यांनी गी. द. मोपासाँच्या कथांचे कलेक्शन त्यांना मिळवून दिले. याआधी मोपासाँच्या सिलॅबसमध्ये पाच कथा वाचल्या होत्या. त्यांच्या लिखाणाची शैली त्यांना कळली होती त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या कथा त्या वाचतच होत्या.. पण तो मोठा ग्रंथच असल्याने त्यातल्या निवडक कथा त्यांनी घेतल्या. त्यांना ज्या कथा भावत होत्या त्या अनुवादीत करत गेल्या आणि तिथे मार्किंग ठेवत गेल्या. सकाळ झाली की कामावर निघताना सई किमान दहा पुस्तके बागेत घेऊन निघतात. गेल्या चार महिन्यात त्यांनी ३०० कॉपी विकल्या. गोरेगाव चर्चगेट दरम्यान जेवढी विकतील तेवढी विकतील असे त्यांना वाटते. पण आपले पुस्तक कोणीतरी विकत घेत आहेत हे पाहून आनंद होतो असं त्या सांगतात.

अशी सुचली कल्पना
सई यांचे कडील राज्य साहित्य पुरस्कार विजेते लेखक. त्यांच्या पहिल्या पुस्तकाला साहित्य संस्कृती मंडळाकडून अनुदानही मिळाले. त्याच्या बऱ्याच प्रती शासनाने त्यांच्याकडे दिल्या होत्या. प्रकाशक जरी शासन असले तरी विक्री तुम्ही करा असे म्हटले. त्याची विक्री कशी करायची हा मोठा प्रश्नच होता. सई यांच्या मामांनी त्यातल्या काही संपवल्या तरीही बऱ्याचशा प्रती होत्या. त्यातूनच रेल्वेमध्ये पुस्तक विक्रीची कल्पना आल्याचे त्या म्हणाल्या.

प्रवाशांचे वेगवेगळे अनुभव
काही पुस्तके अशीच पडून होती, त्यातल्या काही प्रति त्यांच्या मामाने संपवल्या तरीही बर्याचश्या शिलकी होत्या. घर बदलताना ती पुस्तके ढिगाने उतरवताना आईच्या डोळ्यात पाणी आले फार वाईट काटले आणि तेव्हाच पुस्तक विकण्याचे मनाशी ठरवले. त्यावेळी काही प्रती घेतल्या आणि ट्रेनमध्ये चढले. बाजूची मुलगी होती तिला हळूच विचारले हे पुस्तक आहे तुम्ही घ्याल का? तिने लगेच पैसे काढले आणि घेतले. अरे का, कलेला उत्स्फुर्त प्रतिसाद देणारी मंडळी आहेत असे वाटले आणि ती पुस्तके ट्रेनमध्ये विकली. अनेकदा प्रवाशांचे वाईटही अनुभव आले पण त्यातूनच शिकत गेले आणि तोच अनुभव मला माझे पुस्तक विकण्यासाठी झाला.

आपली प्रतिक्रिया द्या