‘संजू’ने तोडला ‘बाहुबली-२’चा रेकॉर्ड

17

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर बेतलेला संजू हा चित्रपट तुफान हिट झाला आहे. बॉक्स ऑफिसवर तीनच दिवसात त्याने १२० कोटींचा आकडा गाठला आहे. या आकड्यामुळे या वर्षीचा तो सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

रविवारी कमाईच्या सर्वाधिक आकड्यामुळे संजूने बाहुबली-२चा रेकॉर्ड मोडला आहे. संजूने पहिल्याच दिवशी ३४.७५ कोटी इतका आकडा पार केला होता. रविवारी हा आकडा ४६. ७१ कोटी इतका झाला होता. बाहुबली-२ने रविवारी ४६.५० कोटी इतकी कमाई केली होती. यंदाचे हिट चित्रपट असलेल्या रेस-३, बागी-२, पद्मावत आणि वीरे दि वेडिंग या चारही चित्रपटांना धोबीपछाड देत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट झाला आहे. मागील काही वर्षांपासून ढेपाळलेल्या रणबीर कपूरच्या करिअरलाही संजूने चांगलीच किक दिली आहे. इंटरनेटवर लीक होऊनही संजू बॉक्सऑफिसवर चांगलीच घोडदौड करताना दिसत आहे.

वीकेंडला कमाई करणारे या वर्षातील ५ सिनेमे –

संजू – १२० कोटी
पद्मावत – ११४ कोटी
रेस ३ – १०६.४७ कोटी
बाघी २ – ७३.१० कोटी
रेड – ४१.०१ कोटी

आपली प्रतिक्रिया द्या