सॅमसनची तुफानी खेळी, अशी कामगिरी करणारा RR चा पहिला खेळाडू; राहुलच्या विक्रमाचीही केली बरोबरी

राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या सलामीच्या लढतीत बलाढ्य चेन्नई सुपर किंग संघाचा 16 धावांनी पराभव केला. राजस्थानने विजयासाठी दिलेले 217 धावांचे आव्हान चेन्नईला पेलवले नाही आणि त्यांचा संघ 200 धावाच करू शकला. यासह राजस्थानने आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली.

IPL 2020 – सोशल मीडियावर पांड्याची उडतेय खिल्ली, ‘हे’ 10 खेळाडूही झालेत ‘हिटविकेट’

राजस्थानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो संजू सॅमसन (Sanju Samson) याने. त्याने फक्त 32 चेंडूत 74 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान 9 वेळा चेंडूला सीमापार आसमान दाखवले. स्मिथसह 100 धावांची भागीदारी करणाऱ्या संजूने या खेळीसह के.एल. राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली.

IPL 2020 – सर्वाधिक वेळा रनआउट झालेले टॉप 5 खेळाडू, ‘या’ चपळ खेळाडूचे नाव वाचून व्हाल अवाक

संजू सॅमसनने चेन्नईच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली आणि मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला. संजूने फक्त 19 चेंडूत अर्धशतकही ठोकले. यासह राजस्थानच्या संघाकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला आणि के. एल. राहुलच्या विक्रमाशी बरोबरीही केली. राहुलने गेल्या वर्षी चेन्नईच्याच विरुद्ध मोहाली येथे खेळताना 19 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

Photo – IPL मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे टॉप 5 खेळाडू

चेन्नईचा पराभव
याआधी राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 216 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नईच्या संघाने डु प्लेसिस, शेन वॉट्सन, सॅम कुर्रम आणि धोनीच्या धमाकेदार खेळीच्या बळावर 6 बाद 200 धावा केल्या, मात्र विजयासाठी 16 धावा कमी पडल्या. आयपीएल 2020 मध्ये चेन्नईचा हा पहिला पराभव आहे. याआधी सलामीच्या लढतीत चेन्नईने मुंबईला पराभूत केले होते.

क्रिकेटसाठी मजुरी केली, IPL मध्ये ‘लॉटरी’ लागली; पहिल्याच लढतीत घेतला ‘विस्फोटक’ खेळाडूचा बळी

आपली प्रतिक्रिया द्या