काळाचौकीत आज ‘सन्मान स्त्री शक्तीचा खेळ खेळूया पैठणीचा’ कार्यक्रम

शिवसेना शिवडी विधानसभा आणि स्वर्गीय नयना अजय चौधरी स्तनकर्क संभावना निवारण ट्रस्टच्या वतीने ‘सन्मान स्त्राrशक्तीचा खेळ खेळूया पैठणीचा’ कार्यक्रम उद्या, 17 मार्च रोजी काळाचौकी अभुदय नगर येथील शहीद भगतसिंग मैदान येथे होणार आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांची असणार आहे. तसेच विभागातील पाच हजारांहून अधिक महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱया एका महिलेला शिवडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, खासदार अरविंद सावंत, आमदार मनीषा कायंदे, उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळी, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विभागातील सर्व शाखाप्रमुख, शाखा संघटक उपस्थित राहणार आहेत. आमदार अजय चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.