सर्व शाळांमध्ये संस्कृत शिकवले पाहिजे, संघाची आग्रही भूमिका

462
suresh-bhaiyyaji-joshi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात बोलताना संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट करतानाच सर्व शाळांमध्ये संस्कृत भाषा शिकवली गेली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. तसेच सरकारने यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे ही म्हटवले आहे.

‘सर्व शाळांमध्ये संस्कृत शिकवले पाहिजे आणि केंद्रातील सरकारने यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. संस्कृत ही सर्व भाषांची आई आहे, अशी आमची भावना आहे. या देशाला समजून घ्यायचे असल्यास संस्कृतशिवाय पर्याय नाही’, असे भैयाजी जोशी म्हणाले.

पीटीआयने हे वृत्तदिले असून सरकार यावर कार्यवाही करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या