‘माणूस’ बनविण्याचे कार्य

124

.वा. लवाटे

संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित ५०वा वार्षिक निरंकारी संत समागम शुक्रवार (२७ जानेवारी) पासून सिडको मैदान, खारघर, नवी मुंबई येथे सुरू झाला आहे. त्यानिमित्त

आजच्या घडीला माणसाच्या अमानुष प्रवृत्तीने कळस गाठला आहे. दहशतवादाने तर अवघ्या मानवजातीला वेठीस धरले आहे. सततच्या दहशतवादी कारवायांनी आणि हिंसक घटनांनी होणारा रक्तपात, अन्याय आणि अत्याचार जणू नित्याचेच झाले आहे. यामध्ये धार्मिक व जातीय विद्वेषाचा सर्वात मोठा वाटा आहे ही अत्यंत खेदाची बाब होय. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली तीही धार्मिक विद्वेषातूनच. त्यावेळी झालेल्या दंगली आणि हिंसाचार हा तर मानवजातीला कलंकच होय. आजही ती आग शमलेली नाही. धार्मिक दहशतवादाचा नवा चेहरा पाहिला तर तो अत्यंत भयावहच आहे. कारण या नव्या चेहऱयाने स्वतःला बलाढय़ समजणाऱया पाश्चिमात्य जगालाही हादरवून सोडले आहे. हे कुठेतरी थांबायला हवं म्हणून पूर्वीच्या काळाप्रमाणेच वर्तमान काळातही बाबा बूटासिंहजी, बाबा अवतारसिंहजी, बाबा गुरबचनसिंहजी आणि बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या रूपाने सत्याचे संदेशवाहक जगामध्ये आले आणि मानवतेच्या सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. सत्याचे विरोधकही जगात नेहमीच राहिलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक युगातील महापुरुषांना त्रास दिलेला आहे. संत निरंकारी मिशनच्या रूपाने उदयास आलेली सत्याधिष्ठत आध्यात्मिक विचारधाराही त्याला अपवाद ठरली नाही. बाबा गुरुबचनसिंहजींनंतर आव्हानात्मक परिस्थितीत मिशनचा कार्यभार सांभाळलेल्या बाबा हरदेवसिंहजींनी कोणत्याही धर्माचे लेबल न हटवता अज्ञानाचे विष दूर करण्याचे कार्य केले. धर्म परिवर्तन न करता भावना परिवर्तन केले. म्हणजेच कोणी हिंदू असेल तर तो हिंदूच राहील, कोणी मुसलमान असेल तर तो मुसलमानच राहील, कोणी शीख असेल तर तो शीखच राहील आणि कोणी ख्रिश्चन असेल तर तो ख्रिश्चनच राहील; पण आता हा हिंदू असा असेल जो मुसलमानाशी किंवा इतर कुठल्याही धर्मियाशी द्वेष किंवा वैर करणार नाही, मुसलमानही इतर धर्मीयांचा तिरस्कार करणार नाही. शीख किंवा ख्रिश्चनदेखील सर्वांशी याच भावनेने वागतील. याचाच अर्थ बाहेरून लेबल काहीही असले तरी आतून तो एक यथार्थ माणूस बनलेला असेल आणि समोरच्याकडे पाहताना त्याच्यातील माणूस पाहील. माणूस माणसाशी माणसासारखा वागू लागेल. धार्मिक विद्वेष, कलह, लढाया आणि धर्माच्या नावाखाली पोसला जाणारा दहशतवाद लयाला जाईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या