दिंडी चालली..! उद्यापासून त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव

167

सामना प्रतिनिधी । नाशिक

त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालेल्या दिंड्यांचे मंगळवारी नाशिक शहरात आगमन झाले.

हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगांच्या गजराने शहर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाची आस लागलेले अनेक दिंड्यांमधील हजारो वारकरी वेगाने त्र्यंबकेश्वरकडे मार्गक्रमण करीत होते. बुधवारी दुपारपर्यंत सर्वच दिंड्या त्र्यंबकेश्वरी दाखल होतील.

आपली प्रतिक्रिया द्या