Video- संतापलेल्या सपना चौधरीने दगडफेक्याला सणकावले

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

गायिका आणि नर्तिका सपना चौधरीचा नवा व्हीडियो सध्या व्हायरल झाला आहे. या व्हीडियोमध्ये तिचे गाणे नाही तर तिचे रौद्ररुप पाहायला मिळाले आहे. एका कार्यक्रमादरम्यान सपना चौधरीवर दगडफेक करण्यात आली. हा दगडफेक करणारा कोण आहे ते सपनाला कळाल्यानंतर तिने स्टेजवरून या दगडफेक्याची वाट लावली. ‘स्टेजवर माझ्यासारखे ठुमके लावून दाखव नाही तुझा पार्श्वभाग ओला झाला तर बघ’ असा सज्जड दमच सपनाने या व्यक्तीला दिला.

‘लहानपणापासून दगडफेक झेलत मी मोठी झाली आहे. असं कोणी केलं तर मला फार वाईट वाटतं मी तुमच्या बहिणीसारखी आहे. स्टेजवर मी नाचले म्हणजे तुमच्यापेक्षा वेगळी झाले असं नाहीये’ असं सपना म्हणाली. चांगला कार्यक्रम सुरू असताना एका माणसामुळे तो खराब होतो, काय मिळतं असं करून या माणसांना असा प्रश्नही सपनाने विचारला आहे.