साराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…

9117

कोरोनाचा देशात प्रादुर्भाव वाढत असताना पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा ओघ सुरू आहे. उद्योजक, खेळाडू, कलाकार आपल्या बचतीतून काही रक्कम कोरोनाचा लढ्यासाठी देत आहेत. आता यात अभिनेत्री सारा अली खान, करीना कपूर आणि सैफ अली खान यांचेही नाव जोडले गेले आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी देखील कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी कोरोना विरुद्धच्या या लढाईत मदतीचा हात दिला आहे. करीनाने यूनिसेफ (UNICEF), गिव्ह इंडिया (GIVE INDIA) आणि द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्‍यूजला (IAHV) सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने याबाबत माहिती दिली.

दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकार पीएम केअर फंडमध्ये डोनेशन करत आहेत. मात्र त्याबाबत करीनाने आपल्या पोस्टमध्ये काही नमूद केलेले नाही. ‘संकटाच्या या काळात आपणा सर्वांना पुढे येऊन मदत करणे आवश्यक आहे. आम्ही दोघांनी यूनिसेफ (UNICEF), गिव्ह इंडिया (GIVE INDIA) आणि द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्‍यूजला (IAHV) सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्र आपण पुढे जाऊ. जय हिंद. या पोस्टखाली करीना, सैफ आणि तैमुर अशी नाव लिहिलेली आहे.

screenshot_2020-03-31-20-41-18-654_com-android-chrome

साराने मदत दिली, पण आकडा गुलदस्त्यात
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिने पीएम केअर फंडमध्ये डोनेट करण्याबाबत पोस्ट केली होती. मात्र तिने सुद्धा किती रक्कम ती दान करणार आहे, याबाबत गुप्तता राखली आहे. याआधी अक्षय कुमार याने 25 कोटी रुपये देणगी दिलेली आहे.

img_20200331_204150

आपली प्रतिक्रिया द्या