मोटे सर्फराज…, हमारी औकात ही नही है… पाकिस्तानी चाहत्यांची मैदानातूनच टीका

29
sarfaraz-pakistan

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ICC World Cup 2019 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत दमदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानी चाहते भयंकर नाराज झाले. पाकिस्तानी संघाविरोधातील नाराजी व्यक्त करणारे व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. त्यातले धम्माल व्हिडीओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

टीम इंडियाकडून पराभूत झालेल्या पाकिस्तान संघावर त्यांच्या चाहत्यांकडून प्रचंड टीका झाली. कर्णधार सर्फराज मैदानात उभा असताना तेथील प्रेक्षकांनी सर्फराज मोटे… अरे टॉस जिता तो पहले बॅटिंग लेनी थी… इम्रान खान की भी आप लोग सुनते नही… अशा शब्दात टीका होत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओ मधील महिला चाहती म्हणते की स्टेडिअममध्ये टीम इंडियाचे समर्थकच जास्त होते. कारण त्यांना विश्वास होता ते जिंकणार याचा. मात्र पाकिस्तानची यांच्यासोबत खेळची औकातच नाही असं ही महिला म्हणत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या