सर्जेपुरात राडा: स्थायी सभापती व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आरिफ शेखसह 40 जणांवर गुन्हे

15

सामना प्रतिनिधी । नगर

सर्जपुरा येथे झालेल्या दोन गटातील राडा प्रकरणी महापालिका स्थायी समितीचे सभापती मुद्दसर शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आरिफ शेख व इतर 40 ते 50 जणांवर विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न करणे यांच्यासह विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दगडफेक करणार्‍यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

तोफखानाचे पोलीस नाईक व्हि. बी. खंडागळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, बुधवारी (दि.15) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अरिफ रफीउद्दीन शेख, बसचा नगरसेवकचे मुदस्सर जहांगीर शेख, समीर शेख आरटीओ एजंट, सादाब आरिफ शेख, समीर नाईक, सज्जाद शेख वेल्डर, इम्मु (जगी ऑटो पार्ट जवळ), इमरान फिटर, इमरान फिटरचा भाऊ, मोग्या, शानू लियाकत शेख, शोएब फकीर शेख उर्फ भंट्या, मज्जू, आदिल काल्या, हबीब मावावाला, तनवीर पठाण मस्तान शाह चौक अध्यक्ष, अमीर, अन्वर याकुब नालबंद, शेख फारुख याकुब नालबंद, शेख अन्वर याकुब नालबंद, सद्दाम गफूर शेख, इमरान नसीम शेख यांच्या सह 15 ते 20 अनोळखी तरुणांनी एकमेकावर दगडफेक करून हॉकी स्टिक, लाकडी दांडके, काठ्या याचा एकमेकावर मारहाण करत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

आपली प्रतिक्रिया द्या