रवी चारी देणार सतारचे धडे!

सतार वादनाची आवड असणाऱया संगीतप्रेमींसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध सतारवादक रवी चारी यांच्याकडून संगीताचे धडे मुंबईत घेता येणार असून एकदिवसीय खास कार्यशाळेचे आयोजन करण्या आले आहे. वांद्रे येथील बालगंधर्व रंग मंदिर येथे ग्लिटेरिटी संगीत अकादमी आणि स्वरदा यांच्या संयुक्त विद्यमाने रवी चारी यांच्या सतारवादनाची ही कार्यशाळा भरवण्यात येणार आहे. रविवार, 16 जून रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 7.30 या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसेल. संगीताची आवड असणाऱया सर्वांसाठी ही कार्यशाळा खुली असणार आहे. ही कार्यशाळा सशुल्क असेल. संगीतप्रेमींनी येताना आपले स्वतःची सतार घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी [email protected] या ई-मेलवर किंवा अश्विनी चौधरी- 9821178330 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.