जिह्यात लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सर्व पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. निवडणुकीच्या काळात वादग्रस्त वक्तव्यावर विशेष लक्ष राहणार आहे. विविध प्रलोभने दाखविण्यासाठी होणाऱ्या पैसे, दारूवाटपावर कडक कारवाई केली जाणार आहे. अशा घटनांवर कारवाई करण्यास शासकीय यंत्रणा कमी पडत असल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे. जिह्यात 100 आदर्श मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या तयारीची माहिती पत्रकारांना दिली.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे, असे सांगत जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, जिह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीकर राबविलेल्या मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरण किशेष मोहिमेत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला आहे. एक लाख 60 लोकांची नावे वगळली आहेत. मतदारयादीत 26 लाख 28 हजार 871 मतदार असून, 13 लाख 31 हजार 254 पुरुष, तर 12 लाख 97 हजार 505 महिला मतदार आहेत. जिह्यामध्ये 112 तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावतील. जिह्यात 3165 मतदान केंद्रे असून, या केंद्रांवर आकश्यक सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करणे व मतमोजणी ही त्या-त्या ठिकाणी होणार आहे. जिह्यात 100 आदर्श मतदान केंद्रे उभारली जाणार असून, महिला कर्मचाऱ्यांद्वारे 16, तर दिव्यांग कर्मचारी संचालित आठ केंद्रे, तर तरुण अधिकाऱ्यांकडून संचालित 16 केंद्रे असतील. जिल्हाधिकारी कार्यालयात टोल फ्री क्रमांक 1950 वर तक्रार निवारण कक्षातील 24 तास कॉल सेंटर सुरू असेल. आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व प्रकारची पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याचे काम सुरू झाले आहे. दिव्यांग मतदारांसाठी त्यांच्या घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत मतदान करण्यासाठी वाहन व्यवस्था केली आहे. तसेच केंद्रावर रॅम्पची सोय, क्हीलचेअरची सोय असेल. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान घरून करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी फॉर्म-12द्वारे सुविधा घेता येणार आहे.
जिह्यातील पाच हजार जणांवर कारवाई होणार- समीर शेख
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या जिह्यातील पाच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय 334 जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दिली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिह्यामध्ये पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध असून, 165 पोलीस अधिकारी, साडेतीन हजार पोलीस अंमलदार आणि 3471 होमगार्ड्स तैनात राहणार आहेत. सीआरपीएफच्या तीन तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. 11 नोक्हेंबर रोजी या तुकडय़ांचे साताऱ्यात आगमन होणार आहे. रूटमार्च एरिया डॉमिनेशन, कोम्बिंग ऑपरेशन अशा विविध माध्यमांतून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न होणार आहेत. जिह्यामध्ये पाच हजार जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अशा व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
सातारा जिह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही ‘पॉकेट’ निश्चित करण्यात आले असून, यामध्ये कराड शहर, म्हसवड, लोणंद, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यांचा काही भाग निश्चित आहे. तेथे जादा मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे. 11 ते 19 नोक्हेंबर यादरम्यान रूटमार्च केले जाणार आहेत. जाहीर सभांवर सायबर सेल सिक्युरिटी टीमचे विशेष लक्ष राहणार आहे. प्रक्षोभक भाषणांचे क्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. निवडणुकीत मद्य अथवा पैसा या आमिषाच्या अनुषंगाने गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कार्यकर्त्यांच्या घरांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे, अशी माहिती समीर शेख यांनी दिली.
n सातारा जिह्यात 26 लाख 28 हजार 871 मतदार असून, 13 लाख 31 हजार 254 पुरुष, तर 12 लाख 97 हजार 505 महिला मतदार आहेत.