साठय़े महाविद्यालयात पुस्तक महोत्सव

55

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी साठय़े महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाने पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्याहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

साठय़े महाविद्यालयाच्यावतीने दरवर्षी माध्यम महोत्सव आयोजित करण्यात येतो. आतापर्यंत चित्रशताब्दी, जत्रा, बायोस्कोप, माध्यमगड अशा विविध संकल्पना या महोत्सवात राबविण्यात आल्या आहेत. यंदाचा महोत्सव पुस्तोकोत्सव या संकल्पनेवर आधारित असून पंधरा ते सतरा डिसेंबरदरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये हा महोत्सव भरणार आहे.

महोत्सवानिमित्त रत्नाकर मतकरी यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाददेखील साधता येणार आहे. करर्म इफ्रस्टॅक्चर हे य पुस्तोकोत्सवाचे मुख्य प्रायोजक असून महोत्सवात नामवंत प्रकाशकंना पुस्तक विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याप्रसंगी चर्चासत्र, व्याख्यानाचे कार्यक्रम होणार असून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट म्हणजे ज्ञानपीठ, साहित्य अकादमी तसेच हिंदुस्थानी साहित्यात महत्वाचे योगदान दिलेल्या साहित्यिकांची ओळख करून देण्यासाठी पोस्टरचे एक स्वतंत्र दालनही उभारण्या येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या