सन्मान व्हाइस चान्सलर बॅनरचा

91

सामना ऑनलाईन । मुंबई

चर्चगेट येथील आझाद मैदानावर ६९वा एनसीसी दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात झाला. यावेळी मुंबई विभागातून दिला जाणारा ‘वाईस चान्सलर बॅनर’ हा विलेपार्लेच्या साठ्ये कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सनी पटकावला. विद्यापीठाच्या उप-कुलसचिव श्री.लीलाधर बनसोड यांच्या हस्ते हा बॅनर प्राचार्यांना देण्यात आला. हा बॅनर सर्व महाविद्यालयांचे विविध उपक्रम आणि मुलांचा सहभाग या निकषांवर दिला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यी नेहमीच वेळोवेळी परिश्रम घेतात. कार्यक्रमास ३ बटालियन एनसीसीचे कर्नल हेमंत सरोच ,लेफ्टनंट गौरांग राजवाडकर आणि सिटीओ कस्तुरी मेढेकर उपस्थित होते.

कार्यक्रमास लेफ्टनंट जनरल विशंबरसिंग मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते .यावर्षी महाराष्ट्राचे दिल्लीत प्रतिनिधित्त्व केलेल्या कॅडेटसनी मान्यवरांना सलामी दिली तसेच विविध प्रकारच्या परेड, नृत्य,गाणी तसेच हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमात मुंबई , कोल्हापूर, पुणे , नागपूर , औरंगाबाद , अमरावती येथील कॅडेटसचा सहभाग होता.

कॉलेजला मिळालेला बॅनर हे एक सांघिक यश आहे, गेल्या ३ वर्षात कॉलेजने हा बॅनर दुसऱ्यांदा मिळवला असून संपूर्ण कॉलेजसाठी हा अभिमानाचा क्षण आहे असे कॉलेजचे प्रभारी प्रचार्य डॉ.मिलिंद जोशी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या