एक महिन्याच्या सुट्टीवर उडवले ६४० कोटी रूपये

27

सामना ऑनलाईन, रियाध

कामाच्या धबडग्यातून मोकळा वेळ काढत आणि सुट्टीसाठी परदेशात फिरायला गेलेल्या व्यक्तीने ६४० कोटी रूपये खर्च केल्यानं अब्जाधींशांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सौदी अरेबियाचा राजा सलमान बिन अब्दुलअजीज आहे. मोरोक्को या देशातील टँजिअर बेटावर या राजाने जवळपास एक महिना घालवला, ज्यासाठी हा खर्च करण्यात आला आहे.

या राजाचा अचकार समुद्रकिनाऱ्याजवळ आलिशान महाल आहे. या महालाचं दरवर्षी नुतनीकरण करण्यात येतं. या महालामध्ये इटालियन फर्निचर असून राजाला फिरण्यासाठी हेलिकॉप्टर ठेवण्यात येतं. त्यासाठी हेलिपॅड हे देखील महालातच बनवण्यात आलेलं आहे. या राजासोबत आलेल्या माणसांसाठी मोरोक्कोतील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये ८०० खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. राजासोबत आलेल्या गाड्यांव्यतिरिक्त २०० गाड्यांचा ताफा मागवण्यात आला होता. या गाड्या राजाच्या पाहुण्यांना फिरण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. राजाच्या या सुट्टीसाठी मोरोक्कोत जवळपास ४५३ गाड्या आल्या होत्या असं सांगण्यात येत आहे.या सगळ्याचा खर्च मिळून ६४० कोटींच्याही पलिकडे असल्याचं सांगण्यात येत आहे

आपली प्रतिक्रिया द्या