सौम्या सेठ अडकली लग्नाच्या बंधनात

सामना ऑनलाईन । मुंबई

स्टार प्लस वाहिनीवरील ‘नव्या’ या प्रसिद्ध कार्यक्रमातील मुख्य अभिनेत्री सौम्या सेठ व तिचा बॉयफ्रेंड अरुण कुमार हे लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. अमेरिकेतील एका प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये १५ जानेवारीला संपूर्ण विधिवत त्या दोघांनी लग्न केले. इंस्टाठामवरील सौम्याच्या फॅन पेजवरुन त्या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यातील एका फोटोत अरुणने डॉलरच्या नोटांचा हार घातल्याचेही दिसत आहे.

सौम्या गेल्या वर्षी तीन महिन्यांच्या अमेरिका दौऱयावर गेली होती. या दौऱ्याच्यावेळीच तीची व अरुणची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. मे २०१६ मध्ये त्या दोघांनी एका खाजगी कार्यक्रमात साखरपुडा केला होता.
सौम्या हिने कलर्स वाहिनीवरील ‘चक्रवर्तीनी अशोक सम्राट’ व स्टार प्लसवरील ‘नव्या’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.