हिंदुस्थानी क्रिकेटसाठी शुभसंकेत! सौरभ गांगुलीवर अभिनंदनाचा वर्षाव

‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार सौरभ गांगुली ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदावर विराजमान होणार हे निश्चित झाल्यानंतर या ‘दादा’ क्रिकेटपटूवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. हिंदुस्थानी क्रिकेटमधील अनेकांनी त्याला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण व मोहम्मद कैफ या माजी सहकारी खेळाडू हिंदुस्थानी क्रिकेटसाठी हा शुभसंकेत असल्याचे ट्विट केले आहे.

गांगुलीचे सात कोटींचे नुकसान होणार

सौरभ गांगुली 23 ऑक्टोबरला हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदीची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज झालाय, मात्र अध्यक्षपदी येताच गांगुलीचे कमीत कमी सात कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. कारण 47 वर्षीय गांगुली सध्या समालोचन आणि व्यावसायिक जाहीरातीही करतो, मात्र अध्यक्षपदी विराजमान होताच त्याचे हे करार संपुष्टात येणार आहेत. याचबरोबर ‘आयपीएल’मधील दिल्ली कॅपिटल संघालाही तो सेवा देऊ शकणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या