‘बीसीसीआय’मध्ये ‘दादा’पर्वाला प्रारंभ, जुने ब्लेझर घालून गांगुली बसला अध्यक्षपदाच्या खुर्चीत

561

‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार आणि दादा नावाने ओळखल्या जाणार्‍या सौरभ गांगुलीने बुधवारी हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार बनल्यानंतर मिळालेले ब्लेझर घालून गांगुली अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसला. याचबरोबर तब्बल 65 वर्षांनंतर ‘बीसीसीआय’ला माजी कर्णधाराच्या रूपाने अध्यक्ष लाभला हे विशेष. ‘बीसीसीआय’चे 39 वे अध्यक्ष म्हणून गांगुलीच्या नावाची घोषणा होताच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासन समितीचा कार्यकालही संपुष्टात आला. आता ‘बीसीसीआय’चे सर्क कामकाज नवनिर्काचित प्रतिनिधीच पाहणार आहेत. कर्णधार म्हणून ज्याप्रमाणे मैदानावर सर्वस्व पणाला लावले त्याचप्रमाणे अध्यक्षपदाची भूमिका बजावतानाही कुठलीच कसर सोडणार नाही, असे 47 वर्षीय गांगुलीने सांगताच ‘बीसीसीआय’मध्ये ‘दादा’ पर्वाला प्रारंभ झाल्याची जाणीव अवघ्या क्रिकेटविश्वाला झाली.  

विराट संघाला नव्या उंचीवर घेऊन जाईन

‘विराट संघाला नक्या उंचीवर घेऊन जात आहे. तो सध्या ‘टीम इंडिया’चाच नव्हे तर क्रिकेट विश्वातील नंबर वन क्रिकेटपटू आहे. त्यामुळे विराटला माझा संपूर्ण पाठिंबा असेल. विराटला काय काटतं? त्याचा प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? हे मी नक्कीच ऐकून घेईन. कारण मी स्वतः संघाचा कर्णधार होतो त्यामुळे कर्णधाराच्या गरजा आणि वर्तक्य मला माहिती आहे,’ असे सौरभ गांगुलीने नमूद केले.

इतरांनीही स्वीकारला पदभार

गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांनी सचिव, तर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमल यांनी खजिनदारपदाचा पदभार स्वीकारला. उत्तराखंडचे महीम वर्मा यांनी उपाध्यपदाची, तर केरळचे जयेश जॉर्ज यांनी सहसचिवपदाची सूत्रे हाती घेतली.  

दुसर्‍यांदा कर्णधाराकडे अध्यक्षपदाची धुरा

‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाची धुरा सहसा राजकारणी किंवा उद्योगपती यांच्याकडेच आलेली आपण पाहिलेली आहे, मात्र सौरभ गांगुली हा अध्यक्षपदी विराजमान होणारा केवळ दुसरा माजी कर्णधार ठरला आहे. महाराजकुमार हे ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवणारे पहिले माजी कर्णधार होते. 1936 साली त्यांनी तीन कसोटी सामन्यांसाठी हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर 1954 साली त्यांनी ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर तब्बल 65 वर्षांनी गांगुलीच्या रूपाने एका माजी कर्णधाराला हा मान मिळाला आहे.

चॅम्पियन लवकर संपत नसतो

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल महत्त्वाचे वक्तव्य करताना गांगुली म्हणाला, ‘धोनीने टीम इंडियाला अनेक देदीप्यमान विजय मिळवून दिलेले आहेत. तुम्ही शांतपणे बसून धोनीने केलेल्या किक्रमांची यादी आठवा. तेव्हा तुम्हीच म्हणाल की, चॅम्पियन इतक्या लवकर संपत नसतो. जोवर मी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष आहे तोपर्यंत सार्‍यांचा योग्य मान राखला जाईल’, असे गांगुली म्हणाला.

आव्हान

आयसीसीमधील बीसीसीआयचे स्थान सध्या डळमळीत झाले आहे. सौरभ गांगुलीसमोर पहिले आव्हान असेल ते आयसीसीमध्ये हिंदुस्थानचा आवाज पुन्हा एकदा बुलंद करायचे. तसेच हिंदुस्थानला एकूण कमाईच्या वाट्यात 372 ते 405 मीलियन अमेरिकन डॉलर्स मिळवून देण्याचे.

देशासाठी खेळणारा क्रिकेटपटू कसोटीमागे 15 लाख, वन डेमागे आठ लाख व ट्वेण्टी-20 मागे चार लाख कमवतो. तसेच बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना एक ते सात कोटी देण्यात येतात, मात्र स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना एका सामन्यामागे 1.4 लाख रुपये मिळतात. गांगुलीला स्थानिक खेळाडूंच्या वेतनावरही लक्ष द्यावे लागेल.

हिंदुस्थान वगळता इतर देशांमध्ये डे-नाईट कसोटीच्या आयोजनाला सुरुवात झाली आहे. हिंदुस्थानात गुलाबी चेंडूने दुलीप ट्रॉफी लढती प्रायोगित तत्त्वावर खेळविण्यात आल्या, मात्र खेळाडूंकडून नाराजीचा सूर उमटवला. गुलाबी रंगाचा एसजी चेंडू प्रभावहीन ठरत आहे. त्यामुळे डे- नाईट कसोटीचा प्रश्नही सोडवावा लागेल.

आणखी काही महत्त्वाच्या बाबी

  • खेळाडूंच्या हितसंबंधाचा मुद्दा
  • रणजीतील दोन सामन्यांमधील अंतर
  • स्थानिक स्पर्धांमधील पंचांची कामगिरी
  • पंचांच्या परीक्षेवर नजर
  • अव्वल दर्जाच्या खेळपट्टय़ा
  • टॅक्सवरून आयसीसीसोबतचा वाद
आपली प्रतिक्रिया द्या