सुजन पिळणकर ठरला ‘सावरकर श्री’

30

सामना प्रतिनिधी । मुंबई

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि स्लिमवेल आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत सुजन पिळणकर याने ‘सावरकर श्री २०१८’चा किताब पटकावला, तर सर्वोत्कृष्ट पोझर म्हणून अभिषेक खेडेकर यांना सन्मानित करण्यात आले.

६० ते ८० किलोवरील विविध वजनी गटांत ही स्पर्धा पार पडली. ६० किलो वजनी गटात ठाण्याचा नितीन म्हात्रे, ६५ किलो वजनी गटात मुंबई उपनगरातील प्रतीक पांचाळ, ७० किलो वजनी गटात ठाणे येथील श्रीनिवास खार्वी, ७५ किलो वजनी गटात पालघरचा रितेश नाईक, ८० किलो वजनी गटात मुंबई उपनगरातील सुशील मुरकर आणि ८० किलोवरील वजनी गटात मुंबईच्या सुजन पिळणकरने बाजी मारली.

यावेळी विजेत्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे ज्येष्ठ संघटक पपी पाटील, स्लिमवेलच्या योगिनी आशीष पाटील आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सर्व गटांमधील प्रथम क्रमांक विजेत्यास ५ हजार, द्वितीय क्रमांक विजेत्याला ४ हजार आणि तृतीय क्रमांक विजेत्याला ३ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या