दशावतार कलेप्रमाणे इतर कलांचीही जपवणूक व्हावी – नाट्यकर्मी जयसिंग आलव

45

सामना प्रतिनिधी । मालवण

‘दशावतार कलेप्रमाणे कोकणातील इतर कलांचीही जपवणूक झाली पाहिजे. कला चिरंतर टिकून राहण्यासाठी कलाकारांना पुढे येण्याची संधी देताना कलेची जोपासना केली पाहिजे. यासाठी कलाकारांनी संघटीत होणे गरजेचे आहे’ असे प्रतीपादन जेष्ठ दशावतारी नाट्यकर्मी जयसिंग आलव यांनी मालवण येथे बोलताना केले.

मालवण अष्टपैलू कलानिकेतन,मालवण श्री दत्त मंदिर मित्र मंडळ भरड-मालवण व मालवणातील दशावतारी नाट्य रसिकाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा नटवर्य कै.बाबी कलिंगण नाट्य पुरस्कार ओसरगाव कणकवली येथील नाट्यकर्मी जयसिंग मारुती आलव यांना भरड दत्त मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात शनिवारी रात्री देण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर म्हणाले,आजच्या पिढीत दशावतार कलेची आवड निर्माण होण्यासाठी कुटुंबातून पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना दशावतार कला पाहण्यासाठी आवर्जून नेले पाहिजे. दशावतार क्षेत्रात जयसिंग मारुती आलव हे ज्ञानाचे भांडार आहेत. पुराणातील दाखले व शिकवण देण्याची कला त्याच्यात आहे. आज नवीन कलाकार दशावतारात येत आहेत यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत ही कला जोपासा, असे खबरेकर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या