गोरेगावमध्ये रंगणार ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’

358

मानाचे पान

गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा…जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान प्रबोधन क्रीडा भवन, गोरेगाव येथे पार पडणार आहे.

हा संगीत महोत्सव मोठय़ा दिमाखात साजरा होणार असल्याची माहिती  भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी देतात. तरुण पिढीही या महोत्सवात सहभागी होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शुक्रवार, शनिवार रात्री व रविवारी सकाळ आणि रात्र अशा चार भागांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याच बरोबर सकाळी संगीत मार्गदर्शन आणि दुपारी शास्त्रीय संगीतविषयक ध्वनिचित्रफीत दाखवण्यात येणार आहेत. तसेच दिग्गज कलाकारांबरोबर नवीन उदयोन्मुख कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

 

महोत्सवातील कार्यक्रम

विजय घाटे, रघुनंदन पणशीकर आणि शीतल कोलवणकर यांचे गायन, तबला वादन आणि नृत्य शक्रवार सायं.5.30 ते रात्री 10 वाजता.

विराज जोशी, निलद्री कुमार, आनंद भाटे, डॉ. पं. अजय पोहनकर,अभिजित पोहनकर यांचे शास्त्रीय गायन,सतारवादन शनिवारी साय.5.30 ते रात्री 12

रोणू मुजुमदार, मैसुर मंजुनाथ यांचे व्हायोलिनवादन रविवारी सकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत.

तबला जुगलबंदी, संतुरवादन रविवारी सायंकाळी 5.30 ते रात्री 10 वाजता.

दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

या महोत्सवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्याशिवाय संगीतविषयक पुस्तके व सीडीज उपलब्ध असणार आहेत. संगीताने भारलेला आणि कानांना तृप्त करणारा हा संगीत महोत्सव गोरेगावमधील आर्य संगीत प्रसारक मंडळ, इंडियन मॅजिक आय व प्रबोधन गोरेगाव यांच्या सहयोगाने संपन्न होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या