सावंतवाडीच्या आयुषचे राष्ट्रीय नेमबाजीत उज्ज्वल यश

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने दहा मीटर एअर पिस्तूल गट स्पर्धेत बाजी मारून राष्ट्रीय स्तरावरील चाचणीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. भोपाळ येथे झालेल्या या स्पर्धेत देशातील दिल्ली, हरयाणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यांतील स्पर्धक सहभागी झाले होते. आयुष याने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करून या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धेतही आयुष्याने वेळोवेळी सुवर्णपदक पटकावून सावंतवाडीचे नाव पर्यायाने सिंधुदुर्ग जिह्याचे नाव उज्ज्वल केले होते. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावर काwतुक आणि अभिनंदन केले जात आहे.