सावंतवाडी फिश मार्केटमध्ये सोशल डिस्टिंन्सगचे बारा वाजले!, मत्स्य खवय्यांनी केली गर्दी

322
फोटो - प्रातिनिधीक

कोरोनाचे लॉकडाऊन काहीसे शिथिल झाल्यानंतर आज अखेर सावंतवाडी नगरपरिषदेचे फिश मार्केट ग्राहकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी मासे खव्वयांची झुंबड उडाली. त्यात सोशल डिस्टंन्सिगच्या नियमाचा फज्जा उडाला.

मार्वेâटमध्ये घडलेल्या या प्रकाराबाबतच्या तक्रारी काहींनी केल्यानंतर त्या ठिकाणी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या आसावरी केळबाईकर, दीपक म्हापसेकर, रसिका नाडकर्णी या कर्मचाNयांनी धाव घेत अनेकांना नियम पाळून खरेदी करण्याचे आवाहन केले.

ग्राहक आणि मच्छी विव्रेâत्यांनी योग्य ते अंतर ठेवून मासे खरेदी करावेत, अन्यथा संबधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा असा इशारा देण्यात आला. लॉकडाऊननंतर तीन महिन्यांनंतर आज शुक्रवारी, १० जुलैला मच्छीमार्केट उघडण्यात आले. तसे भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज हे मार्केट उघडले होते.

आपली प्रतिक्रिया द्या