सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांवर पोस्टकार्ड!

सावंतवाडीची लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहेत. लाकडी भातुकली, आकर्षक रंगीबेरंगी छोटी छोटी भांडी, लाकडी फळे- भाज्या केवळ लहानांना नव्हे तर मोठय़ांनाही भुरळ पडतात. सावंतवाडीची ही कला आता पोस्टकार्डवर दिसणार आहे. टपाल खात्याने आज सावंतवाडीच्या खेळण्यांवर पिक्चर पोस्टकार्ड प्रदर्शित केले. 1 ऑक्टोबर हा जागतिक पोस्टकार्ड दिन आहे. तसेच देशात पोस्टकार्ड येऊन 151 वर्षे झाली आहेत. या दोन्हीचे औचित्य साधून टपाल खात्याने सावंतवाडी येथील लाकडी खेळण्यांवर चित्रमय पोस्टकार्ड प्रदर्शित केले. महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच. सी. अग्रवाल यांच्या हस्ते ऑनलाईन सोहळा झाला.

आपली प्रतिक्रिया द्या