SBI डेबिट कार्ड बंद करण्याच्या विचारात

1349

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या प्रचलित असलेली डेबिट कार्ड बंद करण्याच्या विचारात आहे. याऐवजी कोणत्याही व्यवहारांसाठी वेगळी यंत्रणा आणण्याच्या तयारीत ही बँक असल्याचं सांगितलं जात आहे. या बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले की सध्या देशात 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडीट कार्ड आहेत. यापैकी डेबिट कार्ड प्रणाली बंद करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार सुरू असल्याचं कुमार म्हणाले आहेत.

रजनीश कुमार यांनी सांगितलं आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाचे सगळे ग्राहक ‘योनो’  ( YONO ) सेवेद्वारे ते सध्या डेबिट कार्डामार्फत करत असलेले सगळे व्यवहार करू शकतात. कोणतेही व्यवहार करण्यासाठी किंवा एटीएममधून पैसे काढण्यासाठी ‘योनो’ सेवेचा वापर केला जाऊ शकतो असं रजनीश कुमार यांनी सांगितले आहे. देशभरात आतापर्यंत 68 हजार ठिकाणी योनो कॅशपॉईंट सेवाकेंद्र सुरू करण्यात आली आहे. या केंद्रांची संख्या पुढील 18 महिन्यात 10 लाख करण्याचा या बँकेचा मानस आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या