घर खरेदीसाठी सुवर्णसंधी; एसबीआयची मॉनसून धमाका ऑफर, प्रोसेसिंग फीवर 100 टक्के सूट

sbi-poster

घर खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. गृहकर्जासाठी अनेक बँका विविध ऑफर देत आहेत. आता देशातील सर्वाजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआयने गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी मॉनसून धमाका ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये एसबीआयने गृहकर्जासाठी असलेल्या प्रोसेसिंग फीमध्ये 100 टक्के सूट जाहीर केली आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी या महिन्यात गृहकर्ज घेणे फायद्याचे ठरणार आहे.

एसबीआयने गृहकर्जाववरील प्रोसेसिंग फीमध्ये 100 टक्क्यांची सूट देत आपली मॉन्सून धमाका ऑफर जाहीर केली आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी ही ऑफर 31 जुलै 2021 पर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यात एसबीआयकडून गृहकर्ज घ्यायचे असेल, तर प्रोसेसिंग फीमध्ये 100 सूट मिळणार आहे. याआधी बँकेकडून गृहकर्जासाठी 0.40 टक्के प्रोसेसिंग फी आकारण्यात येत होती. या महिन्यात गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी बँकेने प्रोसेसिंग फी मध्ये 100 टक्के सूट दिली आहे. या ऑफरमुळे गृहकर्ज घेणाऱ्या अनेकांना फायदा होणार असल्याचे बँकेने सांगितले.

एसबीआयचे गृहकर्जावरील व्याजदर 6.70 टक्के आहे. हा दर आतापर्यंतचा निचांकी दर आहे. त्यामुळे या काळात गृहकर्ज घेतल्यास कमी व्याजदरात ते उपलब्ध होणार आहे. बँकेने जाहीर केलेल्या या ऑफरमुळे घरांची विक्री वाढेल आणि कोरोना महामारीमुळे मरगळ आलेल्या रियल इस्टेट क्षेत्राला उभारी मिळण्यास मदत होणार आहे. तसेच ग्राहकांनाही प्रोसेसिंगमध्ये सूट मिळण्यासह कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच चांगल्याप्रकारे कर्जाची परतफेड करणाऱ्या ग्राहकांनाही कमी व्याजदराची ऑफर देण्यात येत असल्याचे बँकेने सांगितले.

याआधी जानेवरी महिन्यात एसबीआयने गृहकर्जावरील प्रोसेसिंग फी माफ केली होती. गृहकर्जाची रक्कम आणि सिबिल स्कोरच्या आधारे देण्यात येणारे गृहकर्ज अधिक सुलभ आणि आकर्षक करण्यात आल्याचे बँकेने सांगितले होते. एसबीआयने गृहकर्जाचे व्याजदर सिबिल स्कोरशी जोडले आहेत. 30 लाख आणि त्यावरील रकमेसाठी व्याजर कमी आहेत. देशातील 8 शहरात 5 कोटींपर्यंतच्या कर्जावर व्याजदरात सूट देण्यात येत असल्याचे बँकेने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या