स्टेट बँकेचे गृहकर्ज स्वस्त

22

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्टेट बँकेने गृहकर्ज आणि वाहनकर्जावरील व्याजदरात ०.०५ टक्क्यांनी कपात केली आहे. एसबीआयचे गृहकर्ज आता ८.३५ टक्क्यांवरून ८.३० टक्के झाले आहे तर वाहनकर्ज ८.७५ टक्क्यांवरून ८.७० टक्के एवढे झाले आहे. ही करकपात १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे. एसबीआयच्या या कपातीनंतर इतर बँकाही व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या