सावधान, किमान रकमेसाठी एसबीआयचे कठोर नियम

12

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने खातेधारकांना खात्यात किमान रक्कम राखणे अनिवार्य केले असून १ एप्रिल २०१७ पासून किमान रक्कम न राखल्यास दंड सोसावा लागू शकतो. मोठ्या शहरांमध्ये ५ हजार, छोट्या शहरांमध्ये ३ हजार, निमशहरी भागांत २ हजार आणि ग्रामीण क्षेत्रांत १ हजार इतकी किमान रक्कम एसबीआय खात्यांमध्ये राखणं अनिवार्य असणार आहे.

एसबीआयने यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, अशा प्रकारे खात्यांमधल्या किमान रकमेच्या ७५ आणि त्यापेक्षा कमी टक्क्यांहून कमी रक्कम ठेवल्यास ५० ते १०० रुपये दंड आणि सेवाकरही दंड म्हणून लागू होणार आहे. ग्रामीण भागासाठी हीच रक्कम २० ते ५० रुपयांमध्ये असणार आहे आणि त्यावरही सेवाकर लागू होणार आहे.

याव्यतिरिक्त ब्रँचमधील खात्यातून तीनपेक्षा जास्त वेळा रोखीचे व्यवहार केल्यास ५० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. ग्राहकांनी एटीएमचा वापर अधिक करावा आणि त्यांना बँकेच्या शाखेत वारंवार यावे लागू नये यासाठी हा नियम करण्यात आला आहे. कारण एसबीआयच्या एटीएममधून १० वेळा व्यवहार नि:शुल्क करता येतात.

आपली प्रतिक्रिया द्या