सर्वोच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांच्या अर्जावर मोठा निर्णय; उच्च न्यायालयाला दिले महत्त्वाचे आदेश

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत नसल्यानं त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं आज मुंबई उच्च न्यायालयाला अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ती सुनावणी झाली होती. एका न्यायमूर्तींपुढं या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यानंतर प्रशासकीय कारणामुळं न्यायामू्र्ती बदलण्यात आले. त्यानंतर अनिल देशुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं जामीन अर्जाचं प्रकरण प्रलंबित होतं. अखेर त्यांच्या वकिलांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती.