फेसबुकच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची गूगल, युट्यूबला नोटीस

378
supreme_court_295

फेसबुक ने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, ट्विटर, गूगल आणि युट्युबला नोटीस जारी केली आहे. देशभरातील उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

तसेच या याचिकेत सोशल मीडियाच्या अकाऊंटशी आधार लिंक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. या नोटीसला 13 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यात यावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयांनी या प्रकरणी याचिकाकर्त्यांनाही नोटीस पाठवली आहे.


फेसबुक वापरकर्त्याचे फेसबुक अकाऊंटशी आधार लिंक करण्यात यावे अशी मागणी तमिळनाडू सरकारने केली होती. या मागणीला फेसबुकने विरोध केला आहे. असे केल्यास वापरकर्त्याच्या गोपनीयतेच्या अधिकारावर गदा येईल असा युक्तिवाद फेसबुकने केला आहे.

फेसबुक आणि आणि व्हॉट्सऍपकडून चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन मद्रास उच्च न्यायालय आणि मुंबई, ओडिशा उच्च न्यायालयात प्रत्येकी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.  फेक न्युज रोखण्यासाठी हे गरजेचे असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या